मानसिंग भाऊ लोक कल्याण अभियान
मानसिंग भाऊ लोक कल्याण अभियान या संस्थे ची सुरुवात युवा नेते विराज मानसिंग नाईक यांच्या संकल्पनेतून डिसेंबर २०२२ रोजी पुढे आली. शिराळा तालुका डोंगरी विभागात असल्या मुळे चांदोली धारण हे या तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक आहे, हा विभाग तालुक्याच्या ठिकाणा पासून ४० ते ५० किमी अंतरावर आहे.
तेथील लोकवस्ती आज हि वाड्या, वस्ती वर आहेत, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी वैयक्तिक कामासाठी येणे अडचणीचे व गैरसोईचे आहे, अशीच परिस्तिथी तालुक्याच्या विभागाची आहे त्यामुळे शासन व प्रशासन देत असलेल्या वैयक्तिक लाभापासून बहुतांश गरजू लोक दूर राहत आहेत. हि गोष्ट लक्षात आल्यानंतर मा. आमदार मानसिंग नाईक (भाऊ) व युवा नेते मा. विराज नाईक (दादा) यांनीं मतदार संघा मध्ये सार्वजनिक लोकल्याणाची शासनस्थरावर वैयक्तिक कामे करणे आवश्यक आहे यावर विचार विनिमय सुरु केले.
त्याचेच फलित म्हणून "मानसिंग भाऊ लोक कल्याण अभियान" या संस्थेची निर्मिती केली आज या संस्थेमध्ये तालुक्यातील प्रेत्येक विभागातील लोकांची कामे सहजरित्या होण्याकरिता विभागनिहाय समन्वयक कार्य करतात डिसेंबर २०२२ रोजी उदयास आलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत शेकडो कुटुंबाना शासनाच्या वैयक्तिक योजनांचा लाभ होत आहे.
अभियान कामे
विविध शासकीय मदत व पेन्शन
१) संजय गांधी निराधार निवृत्त वेतन पेन्शन योजना
२) इंधीरा गांधी राष्ट्रीय विधवा / परित्यक्त्या पेन्शन योजना.
३) इंधीरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्त वेतन योजना.
४) श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन / वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना.
५) अपंग दाखले
६) जातीचे दाखले
७) उत्पन्नाचे दाखले
शासकीय व निमशासकीय लाभ
१) राष्ट्रीय कुटुंब लाभ
२) दोन व तीन चाकी सायकली लाभ
3) शेतकरी अपघाती विमा
४) शौचालय बांधणी
५) बायोगॅस
६) कलाकार मानधन व इतर सहाय्य
गृहबांधणी
१) पंतप्रधान दिवस योजना
२) अपंग घरकुल योजना
३) रमाई घरकुल योजना
आरोग्य
१) मुख्यमंत्री सहायता निधी (दीर्घ ऑपेरेशनसाठी)
२) महात्मा फुलले जनआरोग्य योजना
३) मोतीबिंदू शस्त्रक्रिया
४) अपंग व्यक्ती शस्रक्रिया
५) महिलांच्या शस्त्रक्रिया
६) विविध ट्रस्ट मार्फत सेवा
७) जिल्हापरिषद मार्फत सहाय्यता निधी
स्वंयरोजगार
१) गाय व म्हैस पालन लाभ
२) शेळीपालन लाभ
शिक्षण
१) वह्या वाटप
२) फीमध्ये सवलती
३) मोफत विविध प्रशिक्षण
४) दारिद्र्य रेषेखालील मुलांना गणवेश वाटप
विविध कार्यक्रम उपक्रम
१) आरोग्य शिबीर
२) रक्तदान शिबीर
३) युवक मार्गदर्शन शिबीर
४) स्वयंरोजगार प्रक्षिशण व मार्गदर्शन शिबीर
५) विविध व अपंगांना मार्गदर्शन
६) नेत्र तपासणी शिबीर
नोंदणी
