भैरववाडीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन प्रवेश
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

भैरववाडी (ता. शिराळा) येथील अपक्ष लोकनियुक्त सरपंच संगीता पोतदार यांच्यासह शिवाजी पोतदार, महालिंग पोतदार, रागिणी पोतदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केला. यावेळी तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी प्रमुख तर, राजेंद्र बोबडे, सोसायटीचे अध्यक्ष कृष्णा माने, दशरथ खराडे, उत्तम खराडे उपस्थित होते.
Comments