ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) मध्ये 55 लाख रुपये खर्चात विविध विकास कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक.
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे आज 55 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ केला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मसोबा मंदिर रस्ता काँक्रीटीकरण 35 लाख व भैरवनाथ मंदिर रस्ता काँक्रीटीकरण 20 लाख रुपये या कामांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीतर्फे शाल, पुष्पगुच्छ व फेटा देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संभाजी पाटील, उपसरपंच मनिषा पाटील, माजी सरपंच डॉ. ज्योत्स्ना पाटील, वाळवा प. स. समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, वाळवा बाजार समितीचे माजी उपसभापती सी. व्ही. पाटील, राजारामबापू बँकेचे संचालक अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गायकवाड, माणिक माळी, प्रकाश बर्गे, पंडीत चौगुले, सागर चौगुले, छन्नसिंग पाटील, निवृत्ती यादव, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप पाटील, आरती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, नामदेव गायकवाड, निलेश पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) मध्ये 55 लाख रुपये खर्चात विविध विकास कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक.



Comments