top of page
Search

शिराळा आमदार चषक 2024: 20 संघांच्या क्रिकेट स्पर्धेचा शानदार प्रारंभ

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Oct 2, 2024
  • 1 min read

आमदार चषक 2024

आमदार चषक 2024

शिराळा : येथे आज शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन मार्फत ‘आमदार चषक’ या फुलपिच क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली. आज (ता. 29) सकाळी दहा वाजता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक व युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. शिराळा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक पंचायत समिती गणातील एक व नगरपंचायत शिराळा येथून दोन याप्रमाणे मणदूर, प. त. वारुण, कोकरूड, येळापूर, वाकुर्डे बुद्रूक, पाचुंब्री, सागाव, कणदूर, मांगले, देववाडी, शिराळा नगरपंचायत (अ), शिराळा नगरपंचायत (ब), कासेगाव, वाटेगाव, पेठ, कामेरी, कुरळप, ऐतवडे बुद्रूक, येलूर, चिकुर्डे असे 20 संघ स्पर्धेत सहभागी आहेत. दररोज ४ षटकांचे दहा सामने खेळवले जाणार आहेत. उद्‌घाटन प्रसंगी ‘विश्वास’चे संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम, बाळासाहेब पाटील व यशवंत निकम, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, प्रमोद नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, सुनिल कवठेकर अजय जाधव, उत्तम डांगे, अमित गायकवाड, संजय जाधव, बसवेश्वर शेटे, रमेश कांबळे, सचिन शेटे, संजय हिरवडेकर, संतोष गायकवाड, रणजीत नलवडे, मंगेश कांबळे, उदय गायकवाड, प्रताप मुळीक, वासीम मोमीन, विजय जाधव, प्रतिक पाटील, अभिजित यादव, प्रताप यादव, स्वप्नील दिवटे, अमर खबाले, अक्षय कदम, संतोष कदम, उदय पाटील, कांदे सरपंच रोहित शिवजातक, विजय लोकरे, सुभाष पाटील, काशिनाथ कांबळे, विजय पावले, धनाजी जाधव, बाबासो पाटील, सुहास खोत, अजित गायकवाड, अमित निकम, राजू हिरवडेकर, रुपेश निकम, संदीप उबाळे, मकरंद उबाळे, दीपक पिसाळ आदी व क्रिकेट शैकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार चषक 2024

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page