ऐतवडे बुद्रूक येथे ३.३४ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ; विविध समाजांसाठी प्रकल्पांचा समावेश
- Mansing Naik
- Oct 2, 2024
- 1 min read


ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) येथे ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. त्यामध्ये कुंभार समाज सभागृह १५ लाख, धनगर समाज स्मशानभूमी १० लाख, रामेश्वर मंदिर सभागृह १० लाख, माळी गल्ली काँक्रिटीकरण १८ लाख, मुस्लीम समाज दफनभूमी संरक्षक भिंत १५ लाख, मागासवर्गीय सामाजिक सभागृह ३५ लाख, जगन्नाथ साळुंखे ते अमोल वंडकर घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण २० लाख, सागर कदम ते एम. एस. ई. बी. रस्ता ५ लाख, कवठे पाणंद रस्त्यालगत पूर संरक्षक भिंत उभारणे २ कोटी ६ लाख रुपये या कामांचा समावेश आहे. यांचा शुभारंभ माजी राज्यमंत्री श्री. नाईक व आमदार श्री. नाईक यांच्या श्रीफळ फोडून व कुदळ मारून करण्यात आला. ही सर्व कामे आमदार मानसिंगभाऊ यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली आहेत. या समारंभास सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच संदीप गायकवाड, वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रूक, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, राजारामबापू सूतगिरणीचे संचालक राजेंद्र दिंडे, शीलाताई पाटील, पंचायत समिती माजी सदस्य धनश्री माने, ढगेवाडी सरपंच संदीप सावंत, शेखरवाडी सरपंच अशोक शेखर, नंदिनी कांबळे, माजी सरपंच सलीम जमादार, संग्राम गायकवाड ,रवींद्र कांबळे उत्तम कुंभार, ग्रामपंचायत सदस्य रोहित माळी, महेश कांबळे, अजिंक्य पाटील, जगन्नाथ साळुंखे, प्रियांका शेटे, रेश्मा गुरव, बेबीताई कांबळे, जयश्री पाटील व उज्वला कांबळे, साकवत मुल्ला, सद्दाम मुल्ला, अशोक दिंडे, प्रकाश मदने, प्रकाश माळी, किरण शिरतोडे, शीतल पाटील, सर्जेराव वाघमोडे, सुहेल पठाण, आनंदराव कांबळे, अभिजीत चांदणे, पप्पू कांबळे, सचिन वाघमोडे, संभाजी घोडके, सुनील खरळकर, विशाल लादे, कुमार गायकवाड, अर्जुन कुंभार, अशोक काळुगडे, निवास गायकवाड, राजू पाटील, शशिकांत गिड्डे, नारायण शेटे, नारायण चेंडके, आबासो चेंडके आदी उपस्थित होते.
Comments