top of page
Search

आरळा येथे मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 14, 2024
  • 1 min read

मानसिंगराव नाईक

मानसिंगराव नाईक

आरळा (ता. शिराळा) मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानमार्फत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिराळा तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. त्यातील नेत्र तपासणीत चष्मे लागलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आरळा येथे आज (ता. १३) पार पडला. लोककल्याण अभियानाचे मुख्य प्रवर्तक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक शिवाजी पाटील, कोंडिबा चौगुले, माजी संचालक बाबूराव कळंत्रे, सरपंच बाळाबाई धामणकर, शंकर मोहिते, माजी उपसरपंच सदाजी पाटील, बाजार समितीचे संचालक मुनीर डांगे, काळुंद्रेचे माजी सरपंच विजय पाटील, सोनवडेचे सरपंच युवराज नाईक, माजी सदस्य पांडुरंग बाबर, आरळा ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ बडदे, करुंगलीचे उपसरपंच दिगंबर पाटील, धनगरवाड्याचे सरपंच बाबूराव डोईफोडे, रंगराव पतके, सुजय देशपांडे, बाबूराव देसाई, प्रकाश पाटील, राजेश पाटील, नाथा बेरडे, प्रकाश भाष्टे आदी मान्यवर व आरळा, मणदूर, सोनवडे, धनगरवाडा, येसलेवाडी, मानेवाडी, गुढे, करुंगली, मराठेवाडी या गावातील चष्मे लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page