भाग्यश्री पाटील घरकुल भूमिपूजन: आमदार नाईक यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचा शुभारंभ
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

कांदे (ता. शिराळा) येथे प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत श्रीमती भाग्यश्री भरत पाटील यांना मंजूर झालेल्या घरकुलाचा भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. या वेळी शिराळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संतोष राऊत, ‘विश्वास’चे संचालक सुरेश चव्हाण, उपसरपंच छानूसिंग पाटील, गजानन पाटील, राजेंद्र पाटील, धनाजी पाटील माधव मोहरेकर, अमोल पाटील, नानासो भडकीमकर, विस्तार अधिकारी मनोज जाधव, ग्रामसेवक राहूल आडके अन्य मान्यवर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



Comments