चिखली येथील ‘विश्वास’ विविध उद्योग समूहात गणेशोत्सवानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 2 min read




चिखली (ता. शिराळा) येथील ‘विश्वास’ विविध उद्योग समूहातील संस्थांतर्गत कर्मचाऱ्यांच्या संघात विविध क्रीडा स्पर्धांचे गणेशोत्सवानिमित्त आयोजन केले होते. विविध स्पर्धाचे उद्घाटन ‘विश्वास’ कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, विश्वास शिक्षण समूह व दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, विराज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक, ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, ‘विश्वास’चे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सर्व स्पर्धा विश्वास कारखान्यावरील विविध पटांगणावर दिवसभर सुरू होत्या. विविध उद्योग समुहातील मिळून सुमारे २ हजार कर्मचारी उपस्थित होते. सर्व खेळ प्रकारात प्रचंड चुरस व स्पर्धा जाणवली. सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, ‘विराज’ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक, संचालक भूषण नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते समारंभ पार पडले. यावेळी ‘विश्वास’चे संचालक विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश पाटील, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, बाबासो पाटील, बिरुदेव आमरे, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, सुहास घोडे-पाटील, दत्तात्रय पाटील, विश्वास पाटील, देवेंद्र नाईक उपस्थित होते. सर्व स्पर्धेतील सर्वसाधारण विजेतेपद विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज पटकावून या वर्षीच्या मानाच्या चषकावर नाव कोरले. स्पर्धावार अनुक्रमे विजेते असे : सांघिक स्पर्ध : कबड्डी : विराज स्पोर्टस् (विराज इंडस्ट्रीज, प्रचिती दूध (फ. नाईक दूध संघ), जय हो स्पोर्ट्स (विश्वास, रसायन विभाग). व्हॉलीबॉल : प्रचिती दूध (फ. नाईक दूध संघ), चिंतामणी स्पोर्टस् (विश्वास, प्रशासन विभाग), विराज स्पोर्टस् (विराज इंडस्ट्रीज. रस्सीखेच : विराज स्पोर्टस् (विराज इंडस्ट्रीज), जय भवानी स्पोर्टस् (विश्वास, सुरक्षा विभाग), श्री वेताळबा स्पोर्टस् (विश्वास, वीज निर्मिती विभाग). या तिनही स्पर्धेसाठी अनुक्रमे पाच, तीन, दोन हजार रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. ५० किलोचे पोते घेऊन पळणे : अरुण कुमार, रमन्ना पुजारी, छोटूलाल कुमार यांना अनुक्रमे तीन, दोन, एक हजार रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. वैयक्तीक स्पर्धा : बुद्धिबळ : अमोल पाटील (विश्वास कारखाना, कार्यकारी संचालक) विरंजय मस्के (विश्वास, पाणी पुरवठा विभाग), अजित मोरे (विराज इंडस्ट्रीज). कॅरम : उदयसिंग पाटील (विश्वास, आसवनी प्रकल्प), अभिजित पाटील (विराज इंडस्ट्रीज, बाबासो दिवे (विश्वास, उत्पादन विभाग). या दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे दोन, दीड, एक हजार रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्र देण्यात आले. या सांघिक व वैयक्तीक स्पर्धेचे पंच म्हणून सतीश माने, उदय पाटील, शंकर जाधव, विश्वजीत गाडगे, सौरव माळी, साईनाथ लोहार, आकाश जाधव, अभिराज जगताप, मोहसीन नदाफ यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धांचे व्यवस्थापन विजय थोरबोले व शंकर येवले यांनी केले. बक्षीस मिळविलेल्या प्रत्येक संघाने प्रचंड जल्लोश करुण कारखाना परिसर दणाणून सोडला.



Comments