चिखली येथे 'विश्वास' विविध उद्योग समूहात खेळ पैठणीचा कार्यक्रम भव्य उद्घाटन सोहळा
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read


चिखली (ता. शिराळा) येथील ‘विश्वास’ विविध उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या घरातील महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उद्घाटन आज मोठ्या दिमाखदार पद्धतीने झाले. ‘विश्वासराव नाईक’ कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीता नाईक यांनी दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुश्मिताताई जाधव व कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी मान्यवरांचा सत्कार झाला. कारखान्याचे सचिव सचिन पाटील यांनी स्वागत केले. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी प्रास्ताविक केले. निवेदक म्हणून नितीन गवळी होते. आमदार मानसिंगभाऊ, आपला बझारच्या अध्यक्ष सुनीतावहिणी, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिताताई यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास रंजनाताई नाईक, मनीषाताई नाईक, माजी जि. प. सदस्य अश्विनीताई नाईक, ॲड. शुभलक्ष्मी नाईक, हर्षदा नाईक, ‘विश्वास’च्या संचालक अनिता चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, राजारामबापू बँकेच्या संचालक कमलताई पाटील, वाळवा तालुका कार्यकारिणी सदस्य रंजना पाटील, शिराळा माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, शिराळा सखी मंचच्या अध्यक्ष वैशाली कदम, माजी नगरसेवक ॲड. नेहा सूर्यवंशी, डॉ. मिनाक्षी पाटील, स्मिता महिंद, कल्पना गायकवाड, अर्चना कदम, शुभांगी देसाई, वैशाली भुयेकर, नूतन साठे व सखी मंच शिराळाच्या पदाधिकारी, विश्वास कारखाना, विराज इंडस्ट्रीज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ व विश्वास शिक्षण समूहातील सर्व संस्थांच्या संचालकांचे कुटुंबीय व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



Comments