इंग्रुळ (ता. शिराळा) मध्ये 40 लाख रुपये खर्चात विकासकामांचा शुभारंभ आणि उद्घाटन - आमदार मानसिंग नाईक
- Mansing Naik
- Mar 13, 2024
- 1 min read



इंग्रुळ (ता. शिराळा) येथे 25/15 योजनेतून मंजूर केलेल्या 25 लाख रुपये खर्चाच्या मारुती मंदिरासमोरील सभामंडप कामाचा शुभारंभ, तर 15 लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या शेरी पाणंद रस्ता खडीकरण व मुरुमीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. मी व माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक यांनी श्रीफळ फोडून व कुदळ मारून कामाचा शुभारंभ व उद्घाटन केले. यावेळी माझा व माजी जि. प. सदस्य श्री. नाईक यांचा ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. वारणा कारखाना संचालक विजय पाटील, सरपंच अभिजीत पाटील, उपसरपंच विकास यादव, प्रा. भीमराव गराडे-पाटील, बाजार समितीचे संचालक विजय महाडिक, माजी।सरपंच सुनील यादव, सोसायटी अध्यक्ष विजय ठकार, महादेव ढोले, अर्जुन ढोले, बाजीराव तोडकर, अरविंद कडवेकर, शंकर जद, संजय तमुंगडे, वसंत पोखलेकर, राम ढोले, आनंदा गायकवाड, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
--
इंग्रुळ (ता. शिराळा) मध्ये 40 लाख रुपये खर्चात विकासकामांचा शुभारंभ आणि उद्घाटन - आमदार मानसिंग नाईक



Comments