top of page
Search

ऐतवडे बुद्रुकमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त आमदार मानसिंगराव नाईक यांचे अभिवादन

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 24, 2024
  • 1 min read

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) या जन्मगावी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास आमदार मानसिंगराव नाईक यांनी अभिवादन केले. स्व. अण्णांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे गरीब, होतकरू मुलांना शिक्षण मिळाले. बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी लावलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे, असे मनोगत आमदार श्री. मानसिंगभाऊंनी व्यक्त केले. दरम्यान त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच संदीप गायकवाड, वारणा बँक संचालक अरविंद बुद्रुक, राजारामबापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड, राजारामबापू सूतगिरणीचे संचालक राजेंद्र दिंडे, माजी सरपंच सलीम जमादार, संग्राम गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ साळुंखे, महेश कांबळे, रोहित माळी, अजिंक्य पाटील, पंचायत समिती माजी सदस्य नंदिनी कांबळे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गायकवाड, माजी अध्यक्ष नंदकुमार गायकवाड, सुनील गायकवाड, बळवंत गायकवाड, दिलीप गायकवाड, सचिन पाटील, उत्तम कुंभार, सुनील खरळकर, संजय कांबळे, शकावत मुल्ला, सद्दाम मुल्ला, दादासो लादे, डॉ. अनिल बुद्रुक प्रकाश माळी, अब्दुल मुल्ला, अकबर मुल्ला, डी. बी. गायकवाड, आबासो चेंडके, रंगराव घोडके, अब्दुल रजाक मुल्ला, विजयराज कांबळे, संतोष शिंदे आदी उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page