कासेगाव (ता. वाळवा) मध्ये 30 लाख रुपये खर्चात रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक
- Mansing Naik
- Mar 16, 2024
- 1 min read


कासेगाव (ता. वाळवा) येथे इनामदार वस्ती ते येवलेवाडी पाणंद रस्त्याचे खडीकरण व मुरमीकरण व बाजारपेठ ते मोहितेवाडा रस्त्याचे डांबरीकरण करणे या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कामांसाठी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटीलसाहेब व माझ्या हस्ते दोन्ही कामांची उद्घाटने पार पडली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, उदयसिंह पाटील, सरपंच कल्पना गावडे, उपसरपंच सुजीत पाटील, माजी सरपंच किरण पाटील, सोमोश्वर पाणी संस्था अध्यक्ष अण्णासो माने, पूर्व भाग सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, माजी उपसरपंच दाजी गावडे व शशिकांत डबाणे, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी गवारकर, राजारामबापू बँकेचे संचालक शिवाजी माळी, कृष्णा मंडले, धोत्रेवाडीचे माजी सरपंच रामभाऊ माळी, राजारामबापू दूध संघाचे संचालक पोपट जगताप, ग्रामपंचायत सदस्य विनोद वाघमोडे, संतोष पाटील, दादासो पाटील, अतुल लाहिगडे, कल्पना देशमुख, सारीका गावडे, छायाताई पाटील आदी उपस्थित होते.
--
कासेगाव (ता. वाळवा) मध्ये 30 लाख रुपये खर्चात रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ - आमदार मानसिंग नाईक



Comments