कोकरूड येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्टमार्फत गुणवंतांचा सत्कार सोहळा
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read


कोकरूड (ता. शिराळा) येथे लोकनेते फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत विविध पदावर निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक होते. बारामती शुगर कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष संगीता पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी कर सहाय्यक नवनाथ माने, जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंता चिन्मय मारुती पाटील, महाराष्ट्र पोलिस अक्षय गजानन देसाई, सैन्य दलात संग्राम घोडे-पाटील व उदय दिलीप चांदणे, शिक्षक अमर आनंदा घोडे-पाटील, एम. बी. बी. एस. पदवी निनाद प्रकाश सुतार तसेच अलिशा मुलाणी, शंकर करुंगलेकर, कृष्णा ठोंबरे, तुकाराम घोडे-पाटील, विलास कुंभार व वैष्णवी कुंभार यांचा आमदार मानसिंभाऊंच्या हस्ते सत्कार झाला. आमदार श्री. नाईक, इतर मान्यवर, सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दूध संघाचे संचालक गणेश पाटील, माजी संचालक एन. आर. पाटील, वैभव वाघमारे, राजेंद्र नांगरे, नथुराम कोळवणकर, माजी सरपंच सुनील पाटील, आर. रा. पाटील, पोपट पाटील, विश्वजित पाटील, बाजीराव सणगर आदी मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
लोकनेते फत्तेसिंगराव नाईक ट्रस्ट सत्कार सोहळा



Comments