महाआवास अभियान २०२३-२४ अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read



शिराळा : येथील पंचायत समितीमार्फत महाआवास अभियान २०२३-२४ अंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक प्रमुख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. स्वागत व प्रास्ताविक गट विकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले. यावेळी आमदार श्री. मानसिंगभाऊ यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ठ घरकुल, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गट या पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विस्तार अधिकारी घरकुल कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप झाले. पंचायत समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन सकारात्मक गोष्टींना प्रसिद्धी दिल्याबद्दल यावेळी पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने आमदार मानसिंगराव नाईक, गट विकास अधिकारी श्री. राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पंचायत समितीचे सर्व खातेप्रमुख, सरपंच, ग्रामसेवक, घरकूल लाभार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Comments