महादेववाडी येथे जयंतराव पाटील युवा मंचाच्या गणेशोत्सवात आमदार मानसिंगराव नाईक यांचा सत्कार
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read

महादेववाडी (ता. वाळवा) येथील मा. जयंतराव पाटील युवा मंचच्यावतीने गणेशोत्सवात महाप्रसादाचे आयोजन केले होते. त्यास सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी भेट दिली. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राजारामबापू सहकारी बँकबँकेचबँकेचे संचालक नामदेवराव मोहिते, सोसायटी माजी अध्यक्ष रामचंद्र मोहिते, मंडळाचे अध्यक्ष राहुल मोहिते, वाटेगाव पाणीपुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम यादव, महादेव मोहिते, विकास साळुंखे, दिगंबर मोहिते तसेच मंडळाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments