top of page
Search

चिखलीमध्ये जागर मंगळागौरी स्पर्धा: विजेत्या गटांची घोषणा

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 24, 2024
  • 2 min read




चिखली (ता. शिराळा) : येथे घेण्यात आलेल्या जागर मंगळागौरीचा स्पर्धेत १८ ते ३५ वयोगटात करंजवडेच्या (ता. वाळवा) महालक्ष्मी महिला बचत गटाने, तर ३५ वर्षावरील वयोगटात शिराळ्याच्या दुर्गामाता मंगळागौरी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धा अतिशय चुरशीच्या व दिमाखदार झाल्या. दोन्ही गटात मिळून शिराळा मतदार संघातील २३ संघांचा सहभाग होता. लोकनेते फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट, सखी मंच शिराळा व प्रचिती सांस्कृतिक मंच मार्फत ‘विश्वास’ कारखान्यावरील चिंतन मंडपात स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक, सौ. सुनीता नाईक व यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. आमदार मानसिंगभाऊ, ‘यशवंत’चे अध्यक्ष रणधीर नाईक यांचे उद्‌घाटन प्रसंगी तर, बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी सौ. सुनीता नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील यांनी केले. मान्यवरांचा सत्कार झाला. कार्यक्रमास महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, वाळवा पं. स. माजी सभापती शुभांगी जाधव, रंजनाताई नाईक, माजी जि. प. सदस्य अश्विनीताई नाईक, ॲड. शुभलक्ष्मी नाईक, अंकिता नाईक, सखी मंच अध्यक्ष वैशाली कदम, दूध संघाच्या संचालक रूपाली पाटील, नंदाताई पाटील, डॉ. मनीषा यादव, डॉ. मीनाक्षी पाटील, चिखली सरपंच शुभांगी कुरणे, बिऊर सरपंच स्वाती पाटील, टाकावे सरपंच संगीत कराळे, मांगले माजी सरपंच मीनाताई बेंद्रे, अर्चना कदम, कल्पना गायकवाड, शुभांगी देसाई, रेश्मा खांडेकर, वैशाली भुयेकर, नूतन साठे आदी उपस्थित होते. प्रचिती संस्कृती मंचचे अध्यक्ष डी. एन. मिरजकर यांनी आभार मानले. सदानंद बोंगाणे, राजाभाऊ कदम, डॉ. सूरज चौगुले यांनी परीक्षण केले. विजया माने यांनी सूत्रसंचालन केले.

--------------------------

स्पर्धेतील गटवार अनुक्रमे विजेते असे : १८ ते ३५ वयोगट : महालक्ष्मी महिला बचत गट (करंजवडे), निर्मिती सखी मंच (ऐतवडे खुर्द दोन्ही ता. वाळवा), रामकस्तुरी ग्रुप (वाकुर्डे खुर्द), एकता ग्रुप (बिऊर). ३५ वर्षावरील वयोगट : दुर्गामाता मंगळागौरी ग्रुप (शिराळा), शंभो महादेव ग्रुप (शिराळा), जिजामाता महिला ग्रुप (ठाणापुढे, ता. वाळवा), शिवसमर्थ ग्रुप (उपवळे), वाकेश्वर ग्रुप (वाकुर्डे खुर्द). दोन्ही गटातील विजेत्यांना अनुक्रमे दहा, सात, पाच, तीन, दोन हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह देण्यात आले.


 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page