top of page
Search

नेर्ले येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २ कोटी ५९ लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 14, 2024
  • 1 min read

नेर्ले

नेर्ले

नेर्ले (ता. वाळवा) येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या २ कोटी ५९ लाख रुपये खर्चाच्या नेर्ले ते बहे जाणाऱ्या रस्ता कामाचे भूमिपूजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होत आहे. गावची ४० टक्के शेती या मार्गावर आहे. नेर्ले ते बोरगाव जाणारा ४ किलोमीटरचा रस्ता कामासही लवकर मंजुरी मिळेल. भैरवनाथ पाणंद रस्त्याचे काम आक्टोबरमध्ये सुरू होईल. त्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख दिले आहेत, अशी माहिती आमदार श्री. मानसिंगभाऊ व अध्यक्ष श्री. प्रतिकदादा यांनी मनोगतात दिली. यावेळी सरपंच संजयबापू पाटील, उपसरपंच मनीषा माने, पै. अप्पासाहेब कदम, कृष्णा कारखाना संचालक संभाजी पाटील, माजी संचालक दिलीप पाटील, माजी पं. स. सदस्य सुभाष पाटील, वरद पतसंस्थेचे अध्यक्ष महेश पाटील, हिरोजी पाटील, बाबासाहेब पाटील, शामराव गावडे, विकास माने, रवींद्र जामदार, दीपक पाटील, माणिकआप्पा पाटील, शंकर बल्लाळ, अशोक वाघ, दिलीप वाघ, सुरेश पाटील, सदाशिव पाटील, जालिंदर पाटील, तानाजी गावडे, अशोक वाठारकर, नारायण रोकडे, सुभाष गावडे, बिटू कदम, जालिंदर माने, कृष्णात माने, विकास कदम, ग्रामपंचायत सदस्य, किरण पाटील, शरद बल्लाळ, अनिल साळुंखे, महेश पाटील, मंगल पोळ, जयश्री कुंभार व शैलजा पाटील, दिनकर मोकाशी, डी. आर. पाटील, आशिष पाटील, मोहन महाराज, संभाजी पाटील, ग्राम विस्तार अधिकारी ए. जी. अत्तार आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page