पावलेवाडी येथील राजा शिवाजी युवक संघटनेतर्फे गणेशोत्सवात रक्तदान शिबिराचे आयोजन
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

पावलेवाडी (ता. शिराळा) येथील राजा शिवाजी युवक संघटनेमार्फत कै. युवराज पाटील दादा युवा मंचच्या वतीने गणेशोत्सवामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी उपस्थिती लावली. रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र व भेट वस्तूंचे वाटप केले. यावेळी उपसरपंच मारुती पावले, गणपती पावले, शशिकांत पाटील, राजा शिवाजी संघटना व मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, मंडळाचे इतर पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. नवे पारगाव (ता. पन्हाळा) येथील महात्मा गांधी रक्त केंद्र यांनी रक्त संकलनाचे काम केले.
--
गणेशोत्सवात रक्तदान शिबिर



Comments