सागाव येथे मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read


सागाव (ता. शिराळा) मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानमार्फत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिराळा तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. त्यातील नेत्र तपासणीत चष्मे लागलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम सागाव येथे झाला. लोककल्याण अभियानाचे मुख्य प्रवर्तक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. या निमित्ताने जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांच्यासह वारणा बँकेचे संचालक बळीदाजी पाटील, माजी सरपंच तात्यासो पाटील, बाजार समिती संचालक संग्राम पवार मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास ‘विश्वास’चे संचालक बाबासो पाटील, माजी उपसरपंच शिवाजी माने, दूध संघाचे संचालक अनिल पाटील व मानसिंग पाटील, ढोलेवाडीचे सरपंच रणजित मोरे व उदय नायकवडी, कणदूरचे आनंदा पाटील, माजी सरपंच दिलीप पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक व सागाव, नाटोली, कणदूर, ढोलेवाडी, पुनवत, शिराळे खुर्द येथील चष्मे लाभधारक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक उदय पाटील यांनी केले. आभार जयसिंग पाटील यांनी मानले.



Comments