शिरशी येथे मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत चष्मे वाटप
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read
Updated: Sep 23, 2024


शिरशी (ता. शिराळा) मानसिंगभाऊ लोककल्याण अभियानमार्फत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने शिराळा तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली होती. त्यातील नेत्र तपासणीत चष्मे लागलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप कार्यक्रम शिरसी आज (ता. १३) पार पडला. लोककल्याण अभियानाचे मुख्य प्रवर्तक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ‘विश्वास कारखाना’ माजी संचालक तानाजी महिंद, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक श्रीरंग भोसले, माजी संचालक प्रचिती रघुनाथ भोसले, संभाजी भोसले, आंबेवाडीचे माजी पोलिस पाटील शिवाजी चव्हाण, माजी उपसरपंच बजरंग धुमाळ, गिरजवडे सरपंच सचिन देसाई, वाकुर्डेचे ग्रा. प. सदस्य दिलीप माने, अरुण पाटील, श्रीधर पाटील, विश्वास महिंद, अभिजित माने व शिरसी, गिरजवडे, आंबेवाडी, धामवडे, वाकुर्डे बुद्रूक या गावातील चष्मे लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments