शिवपूरी येथे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याद्वारे रस्ते विकासासाठी २० लाखांचा निधी मंजूर
- Mansing Naik
- Sep 14, 2024
- 1 min read

शिवपूरी (ता. वाळवा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी रस्ते विकासाठी मंजूर केलेल्या २० लाख रुपये खर्चाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कामेरीचे सरपंच रणजीत पाटील, ज्येष्ठ कायकर्ते कल्लाप्पा पोचे, उपसरपंच शामराव माने, माजी सरपंच सुकुमार निगवे, ग्रा. प. सदस्य सुलभा खोत, शोभा येडेकर व स्वाती राजमाने, पुष्पा पोचे, चंद्रकांत पोवेकर, ग्रामसेवक सागर मोकाशी, लिंगराज कमाने, विजय खोत, राजाराम खोत, राजेंद्र खोत, अनिल पोचे, महावीर भक्ते, ठेकेदार वृषभ पोचे, अमोल राजमाने आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments