top of page
Search

वशी येथील लक्ष्मी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर: भूमिपूजन सोहळा यशस्वीरित्या संपन्न - आमदार मानसिंग नाईक

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 13, 2024
  • 1 min read

Mansing Naik

वशी (ता. वाळवा) : येथे लक्ष्मी पाझर तलावाचे साठवण तलावांमध्ये रूपांतर करणे या 7 कोटी 57 लाख रुपये खर्चाच्या कामाचा भूमिपूजन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटीलसाहेब यांच्या हस्ते माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक व माजी जि. प. सदस्य संजीव प्रमुख उपस्थितीत होते. प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. पाटील यांच्यासह मी व इतर मान्यवरांची यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी वशी लाडेगाव जक्राईवाडी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष भगवान पाटील, उपाध्यक्ष व सर्व संचालक, लोकनियुक्त सरपंच अमोल कुंभार, उपसरपंच प्रशांत बावचकर, राजारामबापू बँकेचे संचालक प्रशांत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पी. टी. पाटील, सेवा सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर पाटील, उपाध्यक्ष सुखदेव माने, युवा नेते सतीश पाटील, उल्हास पाटील, वशी पाणी संस्थेचे संचालक जगन्नाथ पाटील, उत्तम कांबळे, पंढरीनाथ हांडे व वसंत कदम, माजी सरपंच जयश्री पाटील व अमृत पाटील, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष अर्चना पवार, भगवान पाटील, लालासो मेथे, प्रवीण पाटील, गणेश पाटील, ए. एस. पाटील, संदीप गायकवाड, शिवाजी पाटील आदी मान्यवर, ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित संपन्न झाला.

--

वशी येथील लक्ष्मी पाझर तलावाचे साठवण तलावात रूपांतर: भूमिपूजन सोहळा यशस्वीरित्या संपन्न - आमदार मानसिंग नाईक

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page