चिखलीमध्ये कै. विश्वासराव नाईक यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार मानसिंगराव नाईक यांचे अभिवादन
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read


चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. २३) ‘विश्वास’ कारखान्याचे संस्थापक कै. विश्वासराव नाईक (भाऊ) यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार मानसिंगराव नाईक यांनी अभिवादन केले. येथील कै. विश्वासरावभाऊ यांच्या समाधीवर आमदार श्री. नाईक यांनी पुष्पचक्र अर्पण केले व कै. भाऊंनी शिराळा तालुक्याच्या जडणघडणीसाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. यावेळी त्यांच्या सोबत कारखान्याचे संचालक सुरेश चव्हाण, संदीप तडाखे, कोंडिबा चौगुले, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक डॉ. दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कारखाना प्रवेशद्वारावरील कै. विश्वासराव भाऊंच्या पुतळ्यास प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
תגובות