अंत्री बुद्रूक : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे.
- Mansing Naik
- Aug 7, 2024
- 1 min read

अंत्री बुद्रूक : शिराळा तालुक्यात मी व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांचा संयुक्त संपर्क दौरा सुरू आहे. त्यामध्ये सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी व बाजार समितीचे उपसभापती विजय महाडीक सहभागी आहेत. अंत्री बुद्रूक येथे पार पडलेल्या बैठकीत पाडळी, पाडळीवाडी, अंत्री खुर्द या गावांचा समावेश होता. बैठकीत आमदार श्री. मानसिंगभाऊ यांच्यासह यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष श्री. नाईक, तालुकाध्यक्ष श्री. नायकवडी, युवकचे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विराज कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकदाजी पाटील, ‘विश्वास’चे संचालक बाळासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोजचे संचालक प्रकाश पाटील, उपसरपंच राजेश चव्हाण, शिवाजी केनचे संचालक उत्तम पाटील, माजी उपसरपंच मोहन पाटील, सुनील पाटील व सुभाष पाटील, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब चौगुले, वाय. बी. पाटील, नानासो पाटील, दत्तात्रय पाटील, भीमराव पाटील, सत्यजीत पाटील, दत्तात्रय चौगुले, सचिन चव्हाण आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments