आंबेवाडीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read

आंबेवाडी (ता. शिराळा) येथील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपच्या सत्यजित देशमुख गटाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत व सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक यांनी केला. राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्यांमध्ये विठ्ठल चव्हाण, श्रीकांत चव्हाण, सुरेश चव्हाण, अमोल चव्हाण, गोरख चव्हाण, राहुल चव्हाण, वैभव चव्हाण, निखिल चव्हाण, अक्षय चव्हाण, अक्षय चव्हाण, दशरथ चव्हाण, अप्पासो काळे, संदीप काळे, नीतेश धुमाळ, गणेश धुमाळ, शुभम पाटील, गोरख मोरबाळे यांचा समावेश आहे. यावेळी संभाजी जाधव, शिवाजी, सचिन, बाबाजी, बजरंग, श्रीकांत, अमित व विजय चव्हाण, राजेंद्र भोसले, बजरंग धुमाळ, धीरज जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments