इस्लामपूर बस स्थानकावर पाणी यंत्रणा आणि रुग्णवाहिकेचा शुभारंभ जयंतराव पाटील यांच्या हस्ते
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


इस्लामपूर (ता. वाळवा) येथील बस स्थानकावर राजारामबापू इंडोमेंट ट्रस्ट मार्फत प्रवाशांच्या सोईसाठी बसविलेल्या मोफत शुध्द व निर्जंतुक पाणी यंत्रणेचे उद्घाटन व जयंत द्रारिद्र्य निर्मूलन अभियान मार्फत सुरू करण्यात आलेल्या दोन रुग्णवाहिकेचा शुभारंभ राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील साहेब व मी केला. प्रारंभ बस स्थानकावरील पिण्याचे पाणी यंत्रणेचे श्रीफळ फोडून व फीत कापून उद्घाटन केले. त्यानंतर रुग्णवाहिकेचे श्रीफळ फोडून व हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री, प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील, मी व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, वाळवा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष विजय पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, इस्लामपूर शहराध्यक्ष शहाजी पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, नेर्ले गावचे सरपंच संजय पाटील, दादासो पाटील, ॲड. धैर्यशील पाटील, जिल्हा बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे, माजी जि. प. सदस्य संभाजी कचरे, संचालक अतुल पाटील, डॉ. नरसिंग देशमुख, सदाशिव सूर्यवंशी, भगवान पाटील, संदीप पाटील, संग्राम जाधव, महिला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, तालुकाध्यक्ष सुनीता देशमाने, माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील, योगिता माळी, रोजा किणीकर, कमल पाटील, पिरअली पुणेकर आदी उपस्थित होते.



Comments