नेर्लेतील किरण पाटील यांची PSI आणि कॅनॉल इन्स्पेक्टरपदी निवड – सांगली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार
- Mansing Naik
- Sep 10, 2024
- 1 min read

नेर्ले (ता. वाळवा) येथील कु. किरण आनंदराव पाटील यांची पी. एस. आय. व कॅनॉल इन्स्पेक्टरपदी निवड झाल्याबद्दल सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. श्री. नाईक यांनी कु. पाटील यांचे दुहेरी यशाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गावचे उपसरपंच सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर पाटील, आनंदराव पाटील, राजेंद्र पाटील व युवक उपस्थित होते.
--
किरण पाटील PSI कॅनॉल इन्स्पेक्टर निवड



Comments