कुसाईवाडीतील गुणवंतांचा महाराष्ट्र पोलिस सेवेत भरतीसाठी सत्कार समारंभ
- Mansing Naik
- Sep 5, 2024
- 1 min read


कुसाईवाडी महाराष्ट्र पोलिस सेवा सत्कार
--
कुसाईवाडी (ता. शिराळा) येथून महाराष्ट्र पोलिस सेवेत भर्ती झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ आज पार पडला. त्यामध्ये प्रशांत पन्हाळकर (ठाणे पोलीस- एस.आर.पी.एफ.), राहुल कोकाटे (कोल्हापूर पोलीस), गिरीराज यादव (सातारा पोलीस), हर्षदा खोत (मिरा भाईंदर पोलीस) यांचा सत्कार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी आमदार श्री. नाईक यांचा सत्कार केला. यानिमित्ताने आमदार मानसिंग भाऊ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच शितल मुदगे, उपसरपंच दत्तात्रय पवार, माजी सरपंच विनोद पन्हाळकर, सोसायटीचे अध्यक्ष भास्कर पवार, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य कविता पवार, बापूराव पवार, विजेंद्र करिअर अकॅडमीचे भाकरे सर, सुभाष पवार, बाळकृष्ण पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश वारंग, मारुती पिसाळे, दीपक पवार, रामचंद्र पवार, बाजीराव पवार, शरद पचकर, शरद पाटील, मच्छिंद्र पवार, अशोक पन्हाळकर यशवंत पन्हाळकर तानाजी मुदगे आदी मान्यवर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान ग्रामस्थांनी निवड झालेल्या मान्यवरांची गावातून मिरवणूक काढली.



Comments