गणेशोत्सव काळात येणाऱ्या प्रवाशांसाठी केलेल्या भाडेवाढी बाबत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read

शिराळा : येथील तहसील कार्यालयात आज (ता. २९) खाजगी प्रवासी वाहतूकदारांनी (ट्रॅव्हल्स) गणेशोत्सव काळात येणाऱ्या प्रवाशांसाठी केलेल्या भाडेवाढी बाबत आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. तहसीलदार शामला खोत-पाटील, वाहतूक निरीक्षक नीता पाटील-सुर्यवंशी, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, एस. टी. आगार प्रमुख धन्वंतरी ताटे, कोकरूड पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, शिराळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्यासह ट्रॅव्हल्सचे मालक, व्यवस्थापक उपस्थित होते. बैठकीतील चर्चेतून गणेशोत्सव काळापुरती मुंबईतून शिराळा-शाहूवाडी तालुक्यातील प्रवाशांसाठी बसून प्रवासासाठी जास्तीत जास्त ७०० रुपये आणि झोपून (स्लिपर) ९०० रुपये पर्यंत अकारावेत. इतर वेळी हे नेहमीच्या दराची आकारणी करावी, असा निर्णय झाला. बैठकीत मान्यवर, अधिकारी व ट्रॅव्हलच्या मालकांनी आपापली मते व्यक्त केली.



Comments