चिंचेवाडी (ता. शिराळा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले.
- Mansing Naik
- Aug 15, 2024
- 1 min read


चिंचेवाडी (ता. शिराळा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास योजनेअंतर्गत मागासवर्गीय समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. या कामासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी पंधरा लाख रुपयांचा निधी दिला आहे. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष विराज नाईक व यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक यांच्या हस्ते कुदळ मारून सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष विराज नाईक व यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी 'विश्वास' कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, माजी सरपंच सदाशिव नावडे, आनंदराव पाटील, लक्ष्मण लामखाने, पांडुरंग गायकवाड, सरपंच रूपाली सुतार, उपसरपंच विश्वास मस्कर, पोलीस पाटील सुनील सुतार, शंकर सुतार, सखाराम काशीद, नितीन मस्कर, राहुल पाटील, दीपक पाटील, पोपट कारंडे प्रकाश, दत्ता, ज्ञानदेव, विनोद कारंडे, विक्रांत सुतार सावळा खोत आदी मान्यवर व ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments