चिखली (ता. शिराळा) आज (ता. १६) येथील काळम्मादेवी मंदिरात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमार्फत कार्यक्षेत्रातील महिलांचा मेळावा संपन्न झाला.
- Mansing Naik
- Aug 16, 2024
- 1 min read


चिखली (ता. शिराळा) आज (ता. १६) येथील काळम्मादेवी मंदिरात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमार्फत कार्यक्षेत्रातील महिलांचा मेळावा संपन्न झाला. बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानी होते. आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक प्रमुख उपस्थितीत होत्या. प्रारंभी सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक निरीक्षक भगवान उरुणकर यांनी केले. आमदार मानसिंगभाऊ, आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सौ. नाईक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, सविता स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले. तालुका विभागीय अधिकारी एस. बी. शेळके यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध ठेव, कर्ज व इतर योजनांची माहिती उपस्थित महिलांना दिली. शिराळा शाखाधिकारी अवधूत चव्हाण, सरपंच शुभांगी कुरणे, शुभांगी देसाई, पी. डी. पाटील, सुरेश कापूरकर, संदीप कुरणे, बाबुराव पाटील आदी मान्यवर व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. सचिन कुरणे यांनी आभार मानले.



Comments