top of page
Search

चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ साठी आज बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 26, 2024
  • 1 min read

Updated: Aug 27, 2024




चिखली (ता. शिराळा) : येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ साठी आज बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला. माझ्या व पत्नी सौ. सुनीता नाईक यांच्या हस्ते बॉयलरमध्ये अग्नी प्रज्वलित केला. यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक व संचालक मंडळ उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संचालक विजयराव नलवडे यांनी केले. बॉयलर विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. बॉयलर कर्मचारी विलास पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजन केले. मी मनोगत व्यक्त केले. संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, हंबीरराव पाटील, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, सुकुमार पाटील, विष्णू पाटील, अजितकुमार पाटील, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, कामगार संघटना अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, यु. जी. पाटील, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद आदी मोठया संख्येने उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page