चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज १५ ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
- Mansing Naik
- Aug 15, 2024
- 1 min read

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात आज १५ ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, संचालक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, युवा नेते भूषण नाईक प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यास उपस्थितांनी मानवंदना दिली. कार्यक्रमास कार्यकारी संचालक अमोल पाटील, सौ. मोनालिसा शिंदे-नाईक, संचालक सर्वश्री दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, विष्णू पाटील, बिरुदेव आमरे, हंबीरराव पाटील, यशवंत निकम, बाळासाहेब पाटील, शिवाजी पाटील, डॉ. राजाराम पाटील, संदीप तडाखे, बाबासो पाटील, सुहास घोडे-पाटील, संभाजी पाटील, सुकुमार पाटील, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, आनंदा पाटील, अजितकुमार पाटील, विश्वास पाटील, कोंडीबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, विश्वास विद्यानिकेतन व विश्वासरावभाऊ विद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments