चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. ३०) विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची ५४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात, खेळीमेळीत व महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करत कारखाना स्थळावर पार पडली.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 2 min read




चिखली (ता. शिराळा) येथे आज (ता. ३०) विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची ५४ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात, खेळीमेळीत व महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करत कारखाना स्थळावर पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक होते. माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व कारखान्याचे उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक प्रमुख उपस्थितीत होते. प्रारंभी संचालक शिवाजी पाटील यांनी श्रद्धांजली वाचन केले. संचालक विराज नाईक यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात कारखान्याने साधलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी नोटीस वाचन केले. पत्रिकेवरील विषयवार वाचन करत असताना सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. यामध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाची संख्या २१ वरून २४ करण्यास मान्यता, सभासदांनी देण्यात येणारी साखर ६५ किलोत वाढ करून ७७ किलो देण्याचा तसेच संचालक मंडळाला सौर ऊर्जा प्रकल्प व कॉम्प्रेस्ड् बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारणी मान्यता देण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. माजी राज्यमंत्री नाईकसाहेब व अध्यक्ष, आमदार मानसिंगभाऊ यांनी सभेस संबोधित केले. या वेळी कारखान्याने प्रोत्साहनपर हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. बैठकीस फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, रणजितसिंग नाईक, सुनीतादेवी नाईक, रंजनाताई नाईक, डॉ. शिमोनी नाईक, मनिषाताई नाईक, अश्विनी नाईक, शुभलक्ष्मी नाईक, प्रमोद नाईक, भूषण नाईक, देवेंद्र नाईक, बी. डी. पवार, यु. जी. पाटील, संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, विजयराव नलवडे, विश्वास कदम, सुरेश चव्हाण, सुरेश पाटील, बिरुदेव आमरे, बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील, सुकुमार पाटील, विष्णू पाटील, अजितकुमार पाटील, सुहास घोडे-पाटील, संदीप तडाखे, तुकाराम पाटील, यशवंत दळवी, डॉ. राजाराम पाटील, यशवंत निकम, संभाजी पाटील, आनंदा पाटील, विश्वास पाटील, कोंडिबा चौगुले, कामगार संचालक दत्तात्रय पाटील तसेच कामगार संघटना सह इतर संस्थांचे पदाधिकारी, माजी संचालक, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक हंबीरराव पाटील यांनी आभार मानले.



Comments