top of page
Search

चिखली (ता. शिराळा) येथे तालुक्यातील नाटोली गावचे विविध पदावर निवड झालेल्या तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला.

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 12, 2024
  • 1 min read



चिखली (ता. शिराळा) येथे तालुक्यातील नाटोली गावचे विविध पदावर निवड झालेल्या तसेच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार समारंभ माझ्या हस्ते संपन्न झाला. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते. कालवा निरीक्षकपदी निवड झालेल्या स्नेहल प्रकाश सातपुते, एम. एच. सेट परीक्षेत मराठी विषयात उत्तीर्ण झालेल्या शुभांगी बाबासाहेब नाकील यांचा सत्कार केला. सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून मीनाक्षी राहुल पाटील यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार सासरे तानाजी भीमराव पाटील यांनी स्वीकारला. मी व जिल्हाध्यक्ष चि. विराज यांनी त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक अनिल पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, नाटोली युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, वकील संभाजी पाटील, उदय निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, किरण पाटील, सर्जेराव लुगडे, सुनील सातपुते, प्रकाश सातपुते, देवदत्त सातपुते, राजू पाटील आदी उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page