चिखली (ता. शिराळा) येथे स्वा. सैनिक कै. आनंदराव बळवंतराव नाईक (तात्या) यांच्या जयंतीनिमित्त आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
- Mansing Naik
- Sep 4, 2024
- 1 min read




चिखली (ता. शिराळा) येथे स्वा. सैनिक कै. आनंदराव बळवंतराव नाईक (तात्या) यांच्या जयंतीनिमित्त आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्काराचे वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ‘विश्वास’ कारखाना स्थळावरील चिंतन मंडपात ‘विश्वास’ उद्योग व शिक्षण समूहातर्फे झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखक कृष्णात खोत, अध्यक्षस्थानी माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक अध्यक्षस्थानी होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी शिराळा मतदार संघ व शाहूवाडी तालुक्यातील गुणवंतांना पुरस्कार वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. माजी राज्यमंत्री नाईकसाहेब, आमदार मानसिंगभाऊ, व सुप्रसिद्ध लेखक श्री. खोत यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य, डॉ. एस. आर. पाटील यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, माजी सभापती सम्राटसिंग नाईक, सुनीतादेवी नाईक, डॉ. शिमोनी नाईक, ॲड. भगतसिंग नाईक, युवा नेते भूषण नाईक, संचालक सर्वश्री. दिनकरराव पाटील, बिरुदेव आमरे, बाबासो पाटील, शिवाजी पाटील, बाळासाहेब पाटील, तुकाराम पाटील, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, बाजार समितीचे सभापती पोपट चरापले, पत संस्थेचे अध्यक्ष सुनील कवठेकर, उपाध्यक्ष सदाशिव भंडारे, सर्व संचालक, कारखान्यातील सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, पतसंस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, शिक्षण संस्थेतील पदाधिकारी व प्राध्यापक व कर्मचारी, सत्कारमूर्ती व त्यांचे नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक विजयराव नलवडे यांनी आभार मानले. प्रा. मान्तेश हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले.



Comments