top of page
Search

चिखली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार व स्व. फत्तेसिंगराव नाईक यांच्या पुतळ्यास अभिवादन, उपस्थित मान्यवरांची सदिच्छा भेट

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Aug 6, 2024
  • 1 min read

Updated: Aug 7, 2024



चिखली (ता. शिराळा) : येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री. देवराज पाटील यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मी व तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष श्री. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन निवडीबद्दल सत्कार झाला. माझ्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्हाध्यक्ष श्री. पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, 'विश्वास'चे संचालक विजयराव नलवडे, सुरेश पाटील, संदीप तडाखे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक काका पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे संचालक बंडा डांगे, राष्ट्रवादीचे शिराळा शहराध्यक्ष सुनील कवठेकर, सागावचे माजी सरपंच तात्यासो पाटील, मजूर फेडरेशनचे संचालक राहुल पवार, कासेगावचे माजी सरपंच दाजी गावडे, कार्वेचे सरपंच शहाजी पाटील, वशी, लाडेगाव व जक्राईवाडी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सत्वशील पाटील, संचालक जगन्नाथ पाटील, राजू दशवंत, बजरंग वाघमारे, अशोक डीगे, सचिन पाटील, जयसिंग पाटील, उदय पाटील, आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page