जत : येथे आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकारी निवड समारंभ पार पडला.
- Mansing Naik
- Aug 16, 2024
- 1 min read



जत : येथे आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा सत्कार व युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकारी निवड समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी उपस्थित राहून मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध पदाधिकारी निवडीचे पत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, जत तालुकाध्यक्ष मन्सूर खातीब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्माताई होर्तीकर, सुरेशराव शिंदे, चन्नाप्पान्ना होर्तीकर, अमोल डफळे साहेब, युवकचे अध्यक्ष सचिन होर्तीकर, बाजार समितीचे संचालक रमेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुशीलाताई होनमोरे व मीनाक्षीताई अक्की, सुभाषराव पाटील, सिद्धूमामा शिरसाट, महादेव अंकलगी, शफिक इनामदार, स्वप्निल शिंदे, विकास लेंगरे, अण्णासाहेब कोडग, शिवाजीराव शिंदे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments