डोंगरवाडी येथे प्रणव तानाजी पाटील यांची निवड व सौ. सारिका उत्तम पाटील यांची पदोन्नती
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read


डोंगरवाडी (ता. वाळवा) : येथील प्रणव तानाजी पाटील यांची पंचायत समिती वाळवा येथे शाखा अभियंता म्हणून निवड, तर सौ. सारिका उत्तम पाटील यांची मंत्रालयात कक्ष अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. त्याबद्दल त्यांनी आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार मानसिंग भाऊ यांनी दोन्ही मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डोंगरवाडीच्या सरपंच सीमा पाटील, हनुमान दूध संस्था संचालक श्रीराम पाटील, उदय पाटील, उत्तम पाटील उपस्थित होते.
--
पदोन्नती



Comments