ढगेवाडी येथे ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन व रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ: मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम
- Mansing Naik
- Sep 6, 2024
- 1 min read



ढगेवाडी (ता. वाळवा) येथे २५/१५ योजना व जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन व सकटे गल्ली रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ झाला. राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंतराव पाटील, माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न झाले. प्रारंभी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष वैभव माने यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व फीत कापून ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन तसेच श्रीफळ फोडून व कुदळ मारून रस्त्याच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांची मनोगते व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, नेर्ले गावचे सरपंच संजयबापू पाटील, राजारामबापू कारखान्याचे संचालक अमरसिंह साळुंखे, राजारामबापू बँकेचे माजी संचालक शहाजी गायकवाड, दीपक पाटील, रामराव पाटील, ढगेवाडीचे सरपंच संदीप सावंत, उपसरपंच स्नेहलता माने, माजी उपसरपंच कमल माने, ऐतवडे बुद्रूकचे सरपंच सुभाष कुंभार, सोसायटी अध्यक्ष अशोक गायकवाड, डोंगरवाडी सरपंच सीमा पाटील, कार्वेचे सरपंच शहाजी पाटील, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, वशीचे सरपंच अमोल कुंभार, पाणी योजना संचालक जगन्नाथ पाटील, सोसायटीचे उपाध्यक्ष सुखदेव माने, विष्णू सावंत, संदीप काईंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष मोहन सावंत, माजी सरपंच मनीषा खोत, भानुदास माने, माजी प्राचार्य सुभाष ढगे, नागनाथ खोत, सोसायटी संचालक जगन्नाथ सकटे, जगन्नाथ माने, सुरेश खोत, डॉ. धनंजय माने आदी मान्यवर तसेच परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी पदाधिकारी, युवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Comments