देववाडी (ता. शिराळा) येथे वारणा नदीस पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकांचे नुकसान झाले आहे. येथे पुराच्या पाण्याचा नागरी वस्तीलाही धोका संभवतो.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


देववाडी (ता. शिराळा) येथे वारणा नदीस पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकांचे नुकसान झाले आहे. येथे पुराच्या पाण्याचा नागरी वस्तीलाही धोका संभवतो. नदी काठावरील 15 वस्ती वरील 82 जनावरे स्थलांतरित केली आहेत. तीन कुटुंबांनी घराला पाणी लागल्याने सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर केले आहे. पुराने निर्माण झालेल्या येथील परिस्थितीची पाहणी आज (ता. 26) केली. यावेळी गजानन चव्हाण, रामचंद्र नांगरे, संजय नांगरे, सोसायटीचे अध्यक्ष मधूकर खोत, विष्णू नांगरे, यशवंत चिले, शरद नांगरे, आत्माराम गोडसे, प्रदीप गोडसे, दशरथ वरेकर, भीमराव खोत, प्रकाश खोत, प्रवीण नांगरे, दशरथ नांगरे, जालिंदर खोत, बंडा शिंदे, मनोज खोत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments