नवी मुंबई : येथील महापे (तुर्भे औद्योगिक वसाहत) येथे काल (ता. 7) फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघ, शिराळाच्या प्रचित दूध पॅकिंग प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read




नवी मुंबई : येथील महापे (तुर्भे औद्योगिक वसाहत) येथे काल (ता. 7) फत्तेसिंगराव नाईक (आप्पा) सहकारी दूध उत्पादक संघ, शिराळाच्या प्रचित दूध पॅकिंग प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या निमित्ताने तुर्भे येथील सेक्टर 19 मध्ये असलेल्या शिवराज हॉल, माथाडी भवनामध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रचित दूध पॅकिंग प्रकल्प उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार मा. जयंतराव पाटील यांच्या हस्ते फीत कापून झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार मा. बाळ्यामामा म्हात्रे होते. मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. माथाडी भवन मध्ये झालेल्या स्नेह मेळाव्यात स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शिराळा तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी केले. प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, आमदार श्री. पाटील, मी, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, यशवंत ग्लुकोजचे संचालक प्रकाश पाटील आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी नगरसेवक नवी मुंबई महापालिका चंद्रकांतशेठ पाटील, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवा नेते भूषण नाईक, दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस, पी. आर. पाटील बापू, विश्वास’चे संचालक शिवाजी पाटील, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, एन. डी. लोहार, पोपटराव जगताप, तानाजी चव्हाण, सुरेश पाटील, शिवाजी चव्हाण, युवराज पाटील, शंकर मोहिते, सुरेश रांजवण, एस. वाय. यमगर, अनिल पाटील, प्रदीप यादव, विजय गलुगडे, गणपती भालेकर, शिवाजी पाटील, सुरेश चिंचोलकर, राजू पाटील, जयसिंग पाटील, शरद जाधव, गणेश पाटील, माणिक दशवंत, तानाजी पाटील, सचिन देसाई, एम. एस. पाटील यांच्यासह शिराळा मतदार संघातील मुंबईस्थित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सम्राट नाईक युवा शक्ती व विराज नाईक युवा मंच मुंबईचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments