top of page
Search

नेरुळ येथे आयोजित ‘स्वराज्य ३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन’ स्पर्धेला जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांची उपस्थिती

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Sep 4, 2024
  • 1 min read




नेरुळ / कोपर खैरेने (नवी मुंबई) येथे शंकरदादा मोहिते प्रस्तुत ‘‘स्वराज्य ३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन’’ व ‘‘३२ शिराळा क्रिकेट असोसिएशन’’ तर्फे भरविण्यात आलेल्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष श्री. विराज नाईक यांनी भेट दिली. आयोजकांतर्फे जिल्हाध्यक्ष श्री. नाईक यांना शाल, श्रीफळ व फेटा देवून सत्कार करण्यात आला. त्यांच्याच हस्ते दोन्ही स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी शंकरदादा मोहिते, विकासअण्णा पाटील, संदीप पाटील, विशाल नायकवडी, प्रकाश पाटील, विजय पावले, सचिन चव्हाण, भगवान पाटील, विकास शेडगे, अरुणदादा मोहिते, प्रकाश भाष्टे, सिद्धार्थ सपकाळ, शंकर यमगर, सुधीर पाटील, एकनाथ पाटील, अशोक चव्हाण, विजय रेठरेकर, गणेश शिरसट, संतोष शिरसट, सतीश पाटील, आदित्य येळवी, सचिन वाळवेकर यांच्या सह सहभागी संघातील खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page