top of page
Search

किनरेवाडी (ता. शिराळा) मध्ये 30 कोटी रुपये खर्चाच्या लघु पाटबंधारे तलावाचे भूमिपूजन!

  • Writer: Mansing Naik
    Mansing Naik
  • Mar 13, 2024
  • 1 min read

M

किनरेवाडी (ता. शिराळा) येथे विशेष प्रयत्नाने लघु पाटबंधारे विभागाकडून मंजूर झालेल्या 30 कोटी रुपये खर्चाच्या लघु पाटबंधारे तलावाचे आज भूमिपूजन झाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते भूमीपूजन समारंभ पार पडला. यावेळी आमदार श्री. नाईक व माजी सदस्य श्री. नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी विश्वासचे संचालक शिवाजी पाटील, काळुंद्रेचे माजी सरपंच विजय पाटील, सरपंच सतीश किनरे, माजी सरपंच सदाशिव नावडे व राकेश सुतार, के. वाय. भाष्टे, नितीन ढेरे, जिल्हा जलसंधारण कार्यकारी अधिकारी श्री. साहुत्रे, ठेकेदार प्रकाश साबळे, बी. टी. किनरे, नानासो पाटील, प्रकाश सोंडुलकर, आनंदा, श्रीरंग, आकाराम व तुकाराम किनारे, लक्ष्मण सुतार, लक्ष्मण पानसरे, शामराव चव्हाण, रघुनाथ कंक, माजी पोलीस पाटील आकाराम किनरे, आकाराम पानसरे, कृष्णा खोत, पांडुरंग खोपडे, आप्पा कंक, सुरेश सोडूलकर, संभाजी जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
 
 

Comments


मानसिंग नाईक (भाऊ): 2019 - 2024

bottom of page