बिळाशी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या हरिजन वसाहतीतील रस्ता काँक्रिटीकरण व गटर बांधकाम या ३५ लाख रुपये खर्चाच्या विविध कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
- Mansing Naik
- Aug 28, 2024
- 1 min read


बिळाशी (ता. शिराळा) येथे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंजूर केलेल्या हरिजन वसाहतीतील रस्ता काँक्रिटीकरण व गटर बांधकाम या ३५ लाख रुपये खर्चाच्या विविध कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यामध्ये मागासवर्गीय समाज वस्ती मधील सुमन लोखंडे घर ते प्राथमिक शाळा रस्ता काँक्रिटीकरण व गटर बांधकाम करणे रक्कम १५ लाख, तानाजी घाटे घर ते सीताराम पांढरे घर रस्ता काँक्रिटीकरण व गटर बांधकाम करणे रक्कम ५ लाख, बाळकू घाटे घर ते मधुकर पांढरे घर रस्ता काँक्रिटीकरण व गटर बांधकाम करणे रक्कम १५ लाख रुपये या कामांचा समावेश आहे. त्याचे भूमिपूजन युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी श्रीफळ फोडून व कुदळ मारून केले. ग्रामस्थांमार्फत जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांना ‘विश्वास’चे संचालक विष्णू पाटील व फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी दूध संघाचे संचालक एस. वाय. यमगर, माजी सरपंच कल्पना यमगर व विश्वास पाटील, ग्रामपंचायत सदस्य विजय रोकडे, इंदूताई यमगर, विकास पांढरे, नामदेव साळुंखे, तानाजी घाटे, महेंद्र पोतदार, जमाल मुलाणी, डॉ. इंद्रजित यमगर, मुन्ना मुलाणी, जगन्नाथ रोकडे, सर्जेराव रोकडे, अंकुश पाटील, अमित जगताप यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.



Comments