मणदूर-धनगरवाडा (ता. शिराळा) येथील १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या मुख्य रस्ता व दोन्ही बाजूंनी गटार बांधकाम करणे व अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या स्मशानभूमी शेड कामाचे आज भूमिपूजन झाले.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


मणदूर-धनगरवाडा (ता. शिराळा) येथील १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या मुख्य रस्ता व दोन्ही बाजूंनी गटार बांधकाम करणे व अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या स्मशानभूमी शेड कामाचे आज भूमिपूजन झाले. माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व माझ्या हस्ते श्रीफळ फोडून भूमिपूजन संपन्न झाले. दरम्यान २४ जुलैला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत येथील दोनशे एकर जमिन येथील सोसायटी संचालकांच्या वारसांना कब्जे हक्काने नावावर करून देण्याचा निर्णय झाला होता. त्यामुळे येथे शासकीय योजनेतून निधी देण्यास अथवा इतर योजनांचा लाभ देण्याची अडचण दूर झाली होती. येथील मुख्य रस्त्यासाठी जिल्हा व इतर जिल्हा मार्ग योजनेतून १.३० कोटी व स्मशानभूमीसाठी आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, माजी उपसभापती एन. डी. लोहार, कोंडीबा चौगुले, शंकर मोहिते, यशवंत ग्लुकोजचे संचालक बाळासाहेब पाटील, संचालक प्रकाश जाधव, आनंदराव पाटील, विजय पाटील, भगवान मस्के, स्थानिकचे बाबुराव डोईफोडे, भागोजी डोईफोडे, विठल शेळके, भगवान लांबोर, रामचंद्र डोईफोडे, धोंडिबा डोईफोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments