मणदूर येथे नवतरुण गणेश मित्र मंडळाचे गणेशोत्सवात रक्तदान शिबिर
- Mansing Naik
- Sep 24, 2024
- 1 min read



मणदूर (ता. शिराळा) येथे नवतरुण गणेश मित्र मंडळामार्फत आज झालेल्या रक्तदान शिबिरास सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व ‘यशवंत ग्लुकोज’चे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी भेट देवून रक्तदात्यांना प्रशस्तिपत्र व भेट वस्तूंचे वाटप केले. या शिबिरास जय हनुमान, गणेश, न्यू परिवर्तन, श्री शिवराज, न्यू मंगलमूर्ती, शेवताईदेवी, जाणता राजा, शिवप्रतिष्ठाण यांचे विशेष सहकार्य मिळाले. यानिमित्ताने जिल्हाध्यक्ष विराज नाईक व ‘यशवंत’चे अध्यक्ष रणधीर नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सावळा पाटील, सरपंच शोभा माने, माजी उपसभापती एन. डी. लोहार, तालुका युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मछिंद्र माने, शंकरदादा मोहिते, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, माजी सरपंच वसंत पाटील, शिवाजी पाटील, श्रीरंग पाटील, राम पाटील, पांडुरंग पाटील, विठ्ठल पाटील, राजाराम माने, जे. के. पाटील, कोंडिबा पाटील, बाळासाहेब निकम, अमोल बडेकर, मारुती पाटील, अधिराज पाटील, बंडोपंत पाटील, सखाराम पाटील, आनंदा जाधव, राम माने, मारुती माने, रोहित सुतार, कुमार बागडे, सिद्धेश माने, करण माने, विश्वनाथ माने, साहिल माने, राहुल चांदे, विराज पाटील, रोहित सुतार आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कऱ्हाडच्या यशवंतराव चव्हाण रक्तपेढीने रक्त संकलन केले.
--
गणेशोत्सवात रक्तदान शिबिर



Comments