महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीच्या अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व भाग्योदय लोकसंचलित साधन शिराळा केंद्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
- Mansing Naik
- Aug 15, 2024
- 1 min read


बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉलमध्ये आज (ता. 14) महिला आर्थिक विकास महामंडळ सांगलीच्या अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प व भाग्योदय लोकसंचलित साधन शिराळा केंद्राची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. मी व आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सुनीतादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या. प्रारंभी साधन केंद्राच्या अध्यक्ष स्वाती पाटील स्वागत व प्रास्ताविक यांनी केले. दीप प्रज्वलन सौ. सुनितादेवी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. सभेचे नोटीस वाचन सचिव सविता कांबळे यांनी तर, अहवाल वाचन व कामकाजाची माहिती व्यवस्थापक संगीता स्वामी यांनी सांगितली. यावेळी बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जाचे धनादेश, बचत गटातील ज्या महिलांच्या पाल्यांची निवड स्पर्धा परीक्षेतून मंत्रालय लिपीक पदावर झाली आहे, त्यांचा सत्कार तसेच उद्योजक महिलांचा सत्कार, बचतगटातील समुदय साधन व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. माझ्यासह महामंडळाचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, सुनीतादेवी नाईक, श्रध्दाताई शिंदे, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक टी. एन. खांडेकर, आय. सी. सी. आय बँकेचे व्यवस्थापक गणेश राऊत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. साहाय्य अधिकारी कल्पेश उमराणीकर, लेखाधिकारी विनायक कुलकर्णी, बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी चेनत भागवत, युनियन बँकेचे शाखाधिकारी सोमानंद शिरखांडे, आय. युनियन बँक सागावचे शाखाधिकारी अमोल कोष्टी या मान्यवरांसह भाग्योदय साधन केंद्राचे सर्व कार्यकारी मंडळ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उषा शेवडे यांनी आभार मानले.



Comments