मांगले (ता. शिराळा) : येथील पारंपरिक बेंदूर सण उत्सवाला पन्नास वर्षाची परंपरा आहे. काल (ता १९) बेंदूर सणानिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी झालो.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


मांगले (ता. शिराळा) : येथील पारंपरिक बेंदूर सण उत्सवाला पन्नास वर्षाची परंपरा आहे. काल (ता १९) बेंदूर सणानिमित्त निघालेल्या भव्य मिरवणुकीत सहभागी झालो. मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व बैल जोडीधारक शेतकऱ्यांचा मानाचा फेटा, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी वारणा कारखाण्याचे संचालक विजय पाटील व मोहन पाटील यांनी सत्काराचे नियोजन केले होते. विश्वास कारखाण्याचे संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच तानाजी जमदाडे, माजी सरपंच मोहन पाटील, डॉ. सतीश पाटील, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, माणिक पाटील, सुरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. वाद्यांच्या गजरात गावच्या प्रवेशद्वारापासून सकाळी अकरा वाजता सुरू झालेली ही भव्य मिरवणूक प्रमुख मार्गावरून जाऊन पुन्हा प्रवेशद्वारावर रात्री आठ वाजता विसर्जित झाली. मिरवणुकीत गावातील नागरिक, महिला मोठ्या उत्साहात सहभागी झाले.



Comments