मांगले (ता. शिराळा) येथे वारणा नदीस पूर येऊन मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकात पाणी आले आहे.
- Mansing Naik
- Aug 6, 2024
- 1 min read


मांगले (ता. शिराळा) येथे वारणा नदीस पूर येऊन मोठ्या प्रमाणात शेती व शेती पिकात पाणी आले आहे. पुराचे पाणी गावाजवळ मोरणा गल्ली, चरापले गल्ली, भैरोबा गल्ली व मंगलनाथ कोपरा येथील घराजवळ आले आहे. तसेच शिंगटेवाडी रस्त्यावरील शिराळा पाणवठा परिसरात पुराचे पाणी आहे. या सर्व ठिकाणी आज (ता. 26) भेट देवून पूर परिस्थिती पाहणी केली. पाणी वाढत राहिल्या कोणीही धोका पत्करू नये. पुराच्या पाण्याचे धोका पोहोचण्याचा संभव असणाऱ्या कुटुंबांनी स्थलांतर करावे, अशी विनंती केली. या संबंधी त्यांनी तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सूचना केल्या. पाहणी वेळी ‘विश्वास’चे संचालक सुरेश पाटील, सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच तानाजी जमदाडे, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अक्षय पाटील, पंडित निकम, डॉ. सतीश पाटील, मजूर फेडरेशनचे संचालक राहुल पवार, माजी सरपंच राजेंद्र दशवंत, धनटेक पाणी संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब चरापले, माणिक चरापले, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष दशवंत, प्रशांत पाटील, प्रतीक पाटील आदी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.



Comments